We are WebMaarathi

Contact Us

मनोरंजन

चला हसुया...

गुरूजी :- पराकोटीच्या विरोधाभासासाचं उदाहरण सांगा बघू. बंड्या:- सर,पाकिस्तानच्या नेत्याचं नाव शरीफ आहे.
Blog Image
2.9K

1) परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक काट्याने खातात,


भारतीय....

मुकाट्याने.

2) शब्दाने शब्द वाढतो
व शाब्दिक वाद निर्माण होतात
शब्द मनावर खुप वाईट परिणाम करतात,
म्हणून शक्यतो
मारामारी करूनच प्रकरण मिटवावे..!

3) मुलगी रडत असते
मुलगा : काय झाल ? का  रडतेस ?
मुलगी : मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
मुलगा : हात्तीच्या  एवढंच न! होत अस  कधी कधी. किती मार्क्स मिळाले तुला?
मुलगी : 88
मुलगा : आयला.... या मार्कात दोन पोर पास झाली असती.

4) बंता : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस
संता: याचे तीन फायदे आहेत
.
.
 .
... 
१ -सोबतच रिव्हिजन होऊन जाते
२- आपल्यावर नजर राहते..
३- आपल्याला अभ्यास करायला एक जन सोबती मिळतो ..