We are WebMaarathi

Contact Us

बालमित्र

कावळा आणि घडा

एकदा एक कावळा पाण्याच्या शोधात फिरत होता. त्याला एक घडा दिसला.
Blog Image
3.4K

त्या घड्यात थोडेसे पाणी होते, पण कावळ्याच्या चोचीला ते पोहोचत नव्हते. त्याने खूप प्रयत्न केले, पण पाणी प्यायला मिळाले नाही.

त्याला एक युक्ती सुचली. त्याने घड्यात छोटे-छोटे दगड टाकण्यास सुरुवात केली. दगड टाकत असताना घड्यातील पाणी वर येऊ लागले. अशा प्रकारे कावळ्याला पाणी प्यायला मिळाले.

बोध: बुद्धी आणि धीराने अशक्य गोष्टीही शक्य होतात.