1. जिव्हारी लागेल असा अपमान...
Employee working from home.
आई - जा बाळा , बाजारातून जरा सामान घेऊन ये...
Son - आई , आत्ता client चा काॅल आहे. नंतर जाऊ शकतो का ?
आई - *I am working on that* आणी *I will get back to you soon* एवढच बोलायच आहे ना .. मी बोलते ..
तु सामान घेऊन ये!
2.मला आज एकाने विचारलेला प्रश्न...!!!
कोविशील्डची लस घेतलेला मुलगा कोवॅक्सीनची लस घेतलेल्या मुलीशी लग्न करू शकतो का? 🤔
.
.
.
कुणाचं काय तर कुणाचं काय!
3. तो बाहेरून प्रथमच मुंबईत आला असावा कारण तो विचारु लागला
"मुलुंड कधी येईल मला उत्तरायचंय." लोकांनी सांगितलं की "ही फास्ट गाडी आहे ही मुलुंडला थांबत नाही".
बिचारा घाबरला. लोकांनी सांगितलं की "घाबरू नको एक कर, ही गाडी मुलुंडला स्लो होते तेंव्हा तू धावत्या गाडीतून उतार. व गाडी ज्या दिशेला जाते त्या दिशेला थोडा धाव म्हणजे तू पडणार नाहीस".
झालं, ठरल्या प्रमाणे त्याला दारात उभं केलं, गाडी मुलुंड ला स्लो झाली तेंव्हा तो स्टेशन वर उतरला आणि ठरल्याप्रमाणे धावला, पण तो इतका जोरात धावला की पुढच्या डब्याजवळ गेला.तिथल्या लोकांनी त्याला धरून आत घेतला व सांगितलं,
"तुझं नशीब चांगलं म्हणून तुला ही गाडी मिळाली, ही फास्ट ट्रेन आहे. मुलुंडला थांबत नाही."
4.
आज मी माझ्या काही टेस्ट करण्यासाठी दवाखान्यात गेलेलो.
टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत मी समोर चहाच्या टपरीवर जाऊन चहा व बिस्किटे घेत असताना,, समोरच एक लहान मुलगा एकटक माझ्याकडे बघत होता...!!
मी त्याला बिस्कीट घेतो का...??
म्हणून विचारले, तेव्हा त्याने मान हलवित होकार दर्शविला...!!
मी त्याला बिस्कीटाचा पुडा घेऊन दिला.
पुडा हातात पडताच मुलगा भराभर खाऊ लागला, न जाणे बिचारा किती दिवसापासून उपाशी होता. तो खात असताना मला खूपच समाधान वाटले...!!
त्याचे शेवटचे दोन बिस्कीटे शिल्लक असताना तेथे त्या मुलाची आई आली की जी केव्हापासून रांगेत ऊभी राहून केसपेपर काढत होती.
आईने आल्या आल्या मुलाच्या थोबाडीत मारली, मी हैरान झालो व तेथून हळूच पसार झालो...!!
त्यावेळी आईचे काही शब्द माझ्या कानावर आले...
"कोणत्या कुत्र्यानं तुला बिस्कीट दिली. अरे मी तुला पन्नास रुप्या खर्च करुन रिक्षानं घेऊन आले...
रिकाम्या पोटी टेस्ट करायला...??
मुडदा बशिवला त्या बिस्किट खाऊ घालण्याऱ्याचा"...!!